२१ वर्षांची होताच शाहरुखच्या मुलीसाठी लग्नाचे स्थळ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

२१ वर्षांची होताच शाहरुखच्या मुलीसाठी लग्नाचे स्थळ

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली नसली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सुहाना नेहमीच चर्चेत असते. २२ मे रोजी सुहानाने तिचा २१ वा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्ताने गौरी खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने किंग खानच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गौरीने ट्विटवर एक फोटो शेअर करत सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुहाना या फोटोत गॅल्मरस अंदाजात दिसतं आहे. गौरीचे ट्वीट पाहताच एक नेटकरी म्हणाला, “गौरी मॅम माझं लग्न सुहानाशी लावून द्या. माझा एक महिन्याचा पगार हा लाख पेक्षा जास्त आहे.” या नेटकऱ्याची कमेंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सुहानाच्या हातात असलेली बॅग ही . लाखाची आहे असे म्हणतं अनेकांनी त्या नेटकऱ्याला ट्रोल केले आहे.