सिंधुदुर्गात प्रवर्ग खुला झाला तरी उमेदवार ओबीसीच असणार - आ. नितेश राणे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सिंधुदुर्गात प्रवर्ग खुला झाला तरी उमेदवार ओबीसीच असणार - आ. नितेश राणे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात सुरू असलेल्या नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी प्रवर्ग खुला झाला असला तरीही त्या प्रभागात भाजपाकडून ओबीसी उमेदवार निवडणुकीत असणार, असे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील ४ नगरपंचायत मध्ये प्रत्येकी ४ प्रभागातील निवडणुका १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून होणार आहे. जरी ओबीसी आरक्षित असलेल्या मतदारसंघ खुला झाला असला तरी त्या सर्व जागांवर ओबीसी उमेदवारच भाजपा निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची माहिती आ. राणे यांनी दिली.