विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे कोरोनाग्रस्त

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे कोरोनाग्रस्त

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री, जेष्ठ काँग्रेस नेते तसेच राज्यसभेत विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना कोरोना लक्षणं जाणवत नसले तरी ते सध्या गृहविलगीकरणात आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांचे पूर्ण लसीकरण झाले होते मात्र ते सतर्कता मात्रेसाठी ते पात्र नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यलयात कार्यरत 5 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.नियमित आर-टी पीसीआर चाचणी केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे लक्षात आले. संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून विलगीकृत व्हावे तसेच पात्र नागरिकांनी लस ग्रहण करावी असे आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यलयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.