राष्ट्रपती राजवटीचे सूर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधान मोदी यांचा ताफा पंजाबात भटिंडा विमानतळावरून निघाल्यावर पंधरा मिनिटे एका उड्डाणपुलावर रोखला गेला. अशा थांबलेल्या ताफ्यामध्येच कोणत्याही सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याची शक्यता जास्त असते, हे पूर्वीच्या अनेक उदाहरणांवरून दिसेल. अमेरिकेचे सर्वात लोकप्रिय अध्यक्ष जॉन एफ केनेडी हे उघड्या मोटरींच्या ताफ्यातून जात असताना त्यांची  गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. केनेडी आपल्या उघड्या मोटरींच्या ताफ्यातून  जात असताना चाहत्यांना नमस्कार करत होते. एका ठिकाणी त्यांचा ताफा अचानक थांबला. तेव्हाच शेजारच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून त्यांच्यावर मारेकर्याने अचूक नेम धरून गोळ्यांचा वर्षाव केला. त्यातच केनेडी यांचा निष्प्राण देह काही क्षणांतच कोसळला. मोदी यांच्या बाबतीतही तसेच घडू शकले असते. कारण असेच पंजाबात अगोदरही घडले आहे. पंजाब प्रश्नावरून देशाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तमिळ प्रश्नावरून राजीव गांधी यांना गमावले आहे. त्या यादीत कदाचित मोदी यांचे नाव आले असते. बातम्या तर अशा आहेत की, पंतप्रधान मोदींच्या ताफ्याच्या इतक्या जवळ कथित आंदोलक शेतकरी आले होते की मोदींच्या अंगरक्षकांना त्यांच्यावर गोळीबार करण्याची परवानगी मागावी लागली. पण मोदींनी ती दिली नाहि आणि सरळ परत जाण्याचा निर्णय घेतला. हा मोदींचा मोठेपणा. पण पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीचे सूर आता उमटले आहेत. त्याचा काही दिवसांत प्रचंड असा जागर होईल. निवडणुकांची पार्श्वभूमी या प्रकरणाला आहेच. पण हे प्रकरण तसे तर फार गंभीर आहे. काँग्रेस ते किरकोळमध्ये झटकण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकलाजेस्तव मुख्यमंत्रि चन्नी यांना जे कुणी सुरक्षेतील त्रुटींना जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे सांगितले आहे. तर इकडे महाराष्ट्र  प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र मोदींच्या मोटरताफ्याजवळ गेलेले भाजपचे लोक होते, असे सांगून तपास भरकटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असणे आणि ढिलाई होणे ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिने गंभीरच नव्हे तर धोकादायकही आहे. याकडे पक्षाचा चष्मा लावून पहाणे हे अत्यंत नीचपणाचे आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी अत्यंत आचरटपणाचे विधान केले आहे. आचरटपणासाठीच ते प्रसिद्ध असल्याने त्यांच्या विधानात आश्चर्य काहीच नाहि. पण आपण देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलत आहोत, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. राजकारण म्हणजे कॉमेडी सर्कस नाहि. वर्षभर शेतकरी रस्त्यावर बसले होते. मोदींना पंधरा मिनिटे रस्त्यावर थांबले तर काय होते, असे अत्यंत बेजबाबदार विधान त्यांनी केले आहे. तर कथित शेतकरी आंदोलकांनी हमने इंदिरा गांधी को मार दिया है, इसको भी मारेंगे  असे विधान उघडपणे केल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पंजाबची हीच भूमी आहे, जेथे खलिस्तान्यांनी निरपराधांचे रक्त सांडले आहे. याच भूमीत प्रचंड रक्तपात झाला आहे. त्यामुळे पंजाबला रक्तपात आणि देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्या हत्या नविन नाहित. म्हणूनच उद्या जर भाजप सरकारने राष्ट्रपती राजवट लावली तर त्यासाठी भाजपच्या केंद्रिय सरकारला दोष देऊन चालणार नाहि. लोकशाहीचा खून वगैरे नेहमीची निरर्गल टिका काँग्रेस करेल, पण त्यात नैतिकता नसेल. काँग्रेसने तर विरोधी पक्षांची सरकारे लोकशाहीच्या गप्पा मारत विनाकारण बरखास्त केली आहेत. तरीही मोदींनी  संयम राखला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आता या प्रकरणात मोदी यांच्या दौर्यादरम्यान सारे रेकॉर्ड जपून ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे जे कुणी दोषी असतील ते उघड़ होतीलच. सोमवारी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसची हालत अगदी खराब झाली आहे. पंजाब काँग्रेस सरकारने इतकी कमालीची बेपर्वाई दाखवली असेल तर सरकार बरखास्तीची कारवाईही अगदी सौम्य वाटेल. मोदी भाजपचे आहेत, म्हणून ही कारवाईची मागणी नाहि. तर देशाच्या पंतप्रधानपदावरील व्यक्तिच्या जिवाशी खेळ जो कुणी करत असेल त्याला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. मग तो कोणताही पक्ष असो. मोदी यांच्या सुरक्षेत चूक होणे या प्रकारामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. आणि त्यासाठी पंजाबातील राज्य सरकार जबाबदार आहे. भारतात यापुढे कुणीही राष्ट्रप्रमुख येण्यास दहा वेळा विचार करेल. कारण त्याला स्वतःच्या जिवाची काळजी लागेल. भविष्यात भारताची अवस्था पाकिस्तानसारखी होऊ नये. मोदींना विरोध म्हणून काँग्रेस नेते थेट पाकिस्तानची भाषा बोलत असतात. पण त्यांनी मोदींना विरोध करताना आपण आपल्याच पंतप्रधानांची सुरक्षा दावणीला लावत आहोत, याचे भान राखलेच पाहिजे. पंजाबात काँग्रेस पुन्हा तोच भयानक खेळ करत आहे. याचे फटके सार्या देशाला आणि येणार्या पिढ्यांना बसतील. भिंद्रनवाले आणि प्रभाकरन प्रकरणात देशाने दोन पंतप्रधान गमावले. आताही तोच खेळ नको. शेतकरी आंदोलनात अनेक खलिस्तान्यांचा हात असलेले कित्येक पुरावे आहेत. तरीही मोदी सरकारने काहीच कारवाई केली नाहि. ही ढिलाईही महागात पडू शकेल. शेतकरी मतांसाठी राष्ट्राची सुरक्षा दावणीला बाधली जाणार नाहि, असेही मोदी सरकारने ठरवले पाहिजे.  पंजाबात राष्ट्रपती राजवट लावली तर कदाचित हिंदू शीख दंगली पेटतील, म्हणूनही केंद्र सरकार कचरत अ