राज ठाकरेंनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन घेतली कल्पिता पिंपळे यांची भेट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज ठाकरेंनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन घेतली कल्पिता पिंपळे यांची भेट

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात ज्युपिटर रुग्णालयात जाऊन फेरीवाल्याच्या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या पालिका महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदी उपस्थित होते. लवकर बऱ्या व्हा. काय करायचं ते बाकी आम्ही बघतो. काळजी घ्या अशा शब्दांत राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला.