राजेश टोपेंचे आवाहन:रुग्ण संख्या वाढत असली तरी घाबरु नका!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राजेश टोपेंचे आवाहन:रुग्ण संख्या वाढत असली तरी घाबरु नका!

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना घाबरुन जाण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील रुग्ण संख्येतील 86 टक्के रूग्णांना सौम्य लक्षणे आहेत आणि हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर उर्वरीत 14 टक्क्यांमध्येही केवळ 2.8 टक्के रूग्ण गंभीर वर्गवारीत आहे अशी माहिती देखील राजेश टोपेंनी दिली आहे. यासोबतच आज राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'आज महाराष्ट्रात अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 2 लाख 45 हजार झाली आहे. मात्र असे असले तरी दिलासा आहे. कारण 86 टक्के लोक होम क्वारंटाइन आहेत. त्यांना सर्दी-खोकला एवढीच लक्षणे दिसत आहेत. उर्वरित 14 टक्के जे रूग्णालयात आहेत यामधील केवळ 0.9 टक्के रूग्ण आयसीयूत आहेत. व्हेंटिलेटरवर 0.32 टक्के, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर 0.59 टक्के रुग्ण आहेत. तर केवळ ऑक्सिजन बेड असलेल्या ठिकाणी 1.89 टक्के रूग्ण आहेत.' यामुळे धोका कमी आहे.