महेश मांजरेकरांचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महेश मांजरेकरांचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वपरिचित नाव असलेले निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर त्यांच्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. मात्र, आता त्यांच्या नव्या मराठी चित्रपटाची बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ही चर्चा चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे होत असताना त्यामुळे महेश मांजरेकरांच्या चिंता मात्र वाढण्याची शक्यता आहे. ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचाया त्यांच्या चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांमुळे थेट राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी म्हणजे दोनच दिवसांपूर्वी यूट्यूबवर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमधील दृश्यांवरून सध्या वाद सुरू झाला असून त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर आयोगानं देखील ती दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच, हा ट्रेलर तातडीने यूट्यूबवरून काढण्याची देखील मागणी केली आहे.