मलायकासोबत ब्रेकअप झालं का?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मलायकासोबत ब्रेकअप झालं का?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी बॉलिवूडमधल्या सर्वात जास्त चर्चिल्या जाणाऱ्या काही जोड्यांपैकी एक आहे. या जोडीचा चाहतावर्ग मोठा आहे. ही जोडी वारंवार काही ना काही कारणाने चर्चेत असतेच. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चांवर खुद्द अर्जुन कपूरनेच पूर्णविराम दिला आहे.

अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मलायकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमधून त्याने सरळ-सऱळच आपलं ब्रेकअप ही अफवा असल्याचं सांगितलं आहे. या कॅप्शनमध्ये अर्जुन म्हणतो, “असल्या अफवांना काहीही वाव नाही. सुरक्षित राहा, आनंदी राहा. सर्वांना सदिच्छा. लव यू ऑल”. या फोटोवर मलायकानेही लाल बदामाचा इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. मलायका आणि अर्जुन हे दोघे २०१८ पासून एकत्र असल्याचं सांगितलं जात आहे. मलायका अरोराने अभिनेता दिग्दर्शक अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. १९ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि २०१७ मध्ये ते विभक्त झाले. या दोघांना १८ वर्षांचा एक मुलगाही आहे. तो सध्या शिक्षणासाठी परदेशात राहत आहे.