मोबाईल फोन, दुचाकी चोरणारी टोळी अटकेत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मोबाईल फोन, दुचाकी चोरणारी टोळी अटकेत

मुंबई : वेष बदलून नागरिकांचे मोबाईल फोन आणि दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून पाच मोटरसायकल आणि १०० पेक्षा अधिक मोबाईल जप्त केले आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व येथील विरवानी बेस्ट बस स्टॅण्डवर गस्तीवर असताना पोलिसांना मोटरसायकलवरुन दोन तरुणांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांना पाहून ते तिथून पसार झाले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता ही सराईत गुन्हेगारांची टोळी असल्याचे उघड झाले. आरीफ खाटीक (१९ वर्ष), राघव चव्हाण (१९ वर्ष), अब्दुल खान (२१ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.