मुंबईतून 7 किलो हिरोइन जप्त, तस्करी करणारी महिला अटकेत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईतून 7 किलो हिरोइन जप्त, तस्करी करणारी महिला अटकेत

मुंबई, : अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात केलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 7 किलो हिरोइन जप्त केले आहे. याप्रकरणी तस्करी करणा-या महिलेला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत 21 करोड असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी महिलेकडून पुढील चौकशी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे महिलेवर पाळत ठेवली होती. तिला ताब्यात घेवून तिची झडती घेतल्यानंतर तिच्याकडे अंमली पदार्थ आढळून आले. तिच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीतून अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांनी मिळाली असून मुंबईतील ड्रग्स तस्करीचे राजस्थान कनेक्शन देखील उघड झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.