मन झालं बाजींदमधील कृष्णा खऱ्या आयुष्यात आहे इतकी स्टायलिश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मन झालं बाजींदमधील कृष्णा खऱ्या आयुष्यात आहे इतकी स्टायलिश

झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका मन झालं बाजींद मधील नायिका कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात हि तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. साधेपणातच सौंदर्य आहे हे कृष्णाकडे पाहून कळतं. पण कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात हि खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे आणि तिचं हे रूप देखील चाहत्यांना खूप आवडतं.
तिच्या स्टाईल बद्दल बोलताना ती म्हणाली, मला स्वतःला कम्फर्टेबल कपडे परिधान करायला आवडतात मग ते ट्रेडिशनल असोत किंवा वेस्टर्न. मला असं वाटत कि आपण सगळे कलर्स ट्राय केले पाहिजेत, मला स्वतःला पेस्टल कलर्स खूप आवडतात पण सर्व कलर्स सोबत एक्सपेरिमेंट करते आणि म्हणूनच कदाचित माझी स्टाईल चाहत्यांना आवडते.
हॉलिवूडमध्ये मी कायली जेनर, जेनिफर लोपेझ, रिहाना यांना फॅशन आयकॉन म्हणून बघते. तर बॉलिवूडमध्ये दीपिका, प्रियांका चोप्रा आणि कोमल पांडे म्हणून जी ब्लॉगर आहे यांना मी फॉलो करते. त्यांच्या स्टाईल मधून मला इन्स्पिरेशन मिळतं.