मंत्री एकनाथ शिंदे आणि खा. सावंत कोरोना पॉझिटीव्ह

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मंत्री एकनाथ शिंदे आणि खा. सावंत कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई : महाराष्ट्रातील इतर नेत्यांपोठापाठ राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
यासंदर्भातील आपल्या ट्विटर संदेशात शिंदे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. दरम्यान एकनाथ शिंदे यांना दुस-यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यासोबतच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरद्वारे ते म्हणाले की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलेय.