मकर संक्रांतीनिमित्त मीशोचे सर्वतोपरी प्रयत्न

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मकर संक्रांतीनिमित्त मीशोचे सर्वतोपरी प्रयत्न

मुंबई : मकर संक्रांतीचा सण म्हणजे पतंग आणि तीळ-गुळाच्या मिठाया हे घट्ट समीकरण आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पाहता, आपल्या युजर्सना घरातूनच सुरक्षित राहून हा सण छान साजरा करता यावा यासाठी मीशो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. घराची सजावट, स्वयंपाकघर, डायनिंग यासाठीच्या उपयोगी व आकर्षक वस्तू आणि कपडे अशी भरपूर उत्पादने मीशोवर परवडण्याजोग्या किमतींमध्ये उपलब्ध आहेत. खरेदी करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

मीशोवरील खास उत्पादनांची झलक
घराची सजावट :
कुटुंबाने एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची नामी संधी म्हणजे सण आणि त्यासाठी तुमच्या घराची अनोखी सजावट करण्यासाठी ही सुंदर वॉल हँगिंग्स नक्की खरेदी करा.
लिविंग रूम असो किंवा डायनिंग एरिया किंवा बेडरूम, या छानशा कुशन्स तुमच्या घराला नवे, ताजे, टवटवीत बनवतील.

भेटवस्तू
मधल्या वेळेसाठी पोषक खाण्याचे स्वादिष्ट पर्याय देणारे हे ड्राय फ्रुट हॅम्पर आरोग्यदायी आणि आकर्षक देखील असल्याने भेट म्हणून देण्यासाठी अगदी योग्य आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबियांना व मित्रमंडळींना तिळाचे लाडू भेट म्हणून द्या. चविष्ट, खुसखुशीत, पोषक आणि संक्रांतीला हवेच असे हे लाडू सगळ्यांना नक्कीच आवडतील.

सणासाठी खास कपडे
संक्रांतीसाठी पारंपरिक काळी साडी आणि सोबत सुंदरसा ब्लाउज यांची खरेदी झालीच पाहिजे. चंदेरी कॉटन, हॅन्डलूम सिल्क यांचे उत्तमोत्तम पर्याय मीशोवर उपलब्ध आहेत.
बिल्लोरांनी सजवलेले, गोल्ड-प्लेटेड पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीची ही योग्य वेळ आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीचा शानदार ''साज'' देखील मीशोवर खरेदी करता येईल.
पुरुषांसाठी हा कुर्ता अतिशय सुबक आणि स्टायलिश आहे. जीन्स असो किंवा पारंपरिक पायजमा, त्यावर हा कुर्ता घालून तुम्ही उठून दिसणार हे नक्की.

 

15

व्यापार

फोटो- इंडिया कोरिया

50 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य पूर्ण करण्यास भारत-कोरिया सिद्ध
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या आमंत्रणावरून रिपब्लिक ऑफ कोरियाचे व्यापारमंत्री येओ हान-कू भारताच्या अधिकृत भेटीवर आले. व्यापारमंत्री येओ हान-कू यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक यांच्याशी संबंधित सर्व मुद्यांवर दोन्ही मंत्र्यांनी तपशीलवार चर्चा केली.
सीईपीए अर्थात समावेशक आर्थिक भागीदारी करार अद्ययावत करण्यासाठीच्या वाटाघाटींवरील चर्चेला नव्याने वेग देण्यात सहभागी होण्याबाबत तसेच दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीसाठी लागोपाठ संवाद घडण्यास प्रोत्साहन देण्याबाबत भारत आणि कोरियाने संमती दर्शविली.
दोन्ही देशांमधील उद्योग क्षेत्राला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्या खुलेपणाने सोडविण्याबाबत दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शविली आणि वाटाघाटी करण्यासाठी नेमलेल्या आपापल्या पथकांना एकमेकांच्या नियमितपणे भेटी घेऊन सीईपीए करार अद्ययावत करण्यासाठीच्या वाटाघाटी कालबद्ध पद्धतीने सर्व भागधारकांच्या मदतीने शक्य तितक्या लवकर संपविण्याचे निर्देश दिले जेणेकरून वर्ष 2018 मध्ये झालेल्या परिषदेत निश्चित करण्यात आलेले, 2030 पर्यंत 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे लक्ष्य साध्य करता येईल.
ह्या नियमितपणे होणाऱ्या वाटाघाटी म्हणजे दोन्ही देशांतील व्यापार समुदायांना येणाऱ्या अडचणींवर तसेच पुरवठा साखळीसह व्यापाराशी संबंधित नव्याने उदयाला येणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक मंच म्हणून कार्य करेल. भारत आणि कोरिया या दोन्ही देशांना परस्पर लाभदायक असलेला न्याय्य आणि समतोल पद्धतीने विकास साधण्यासाठी या दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यावर दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले.