भारतीय सण देशाच्या विविधतेतील एकतेचे उदाहरण : राष्ट्रपती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतीय सण देशाच्या विविधतेतील एकतेचे उदाहरण : राष्ट्रपती

नवी दिल्ली : देशात विविध भागात साजरा होणा-या विविध सणांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. एका विशेष संदेशाद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मकर संक्रांती, पोंगल, भोगाली बिहू, उत्तरायण आणि पौष पर्व च्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
विशेष संदेशात राष्ट्रपती म्हणाले, " लोहरी, मकर संक्रांती, पोंगल, भोगली बिहू, उत्तरायण आणि पौष पर्वाच्या निमित्ताने देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा. आपल्या देशात साजरे होणारे बहुसंख्य सण निसर्ग आणि शेतीशी असलेले आपले अविभाज्य नाते दर्शवतात.
हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू होत असल्यामुळे लोहरी, मकर संक्रांती, पोंगल, भोगली बिहू, उत्तरायण आणि पौष पर्व हे सण म्हणजे पिकांच्या कापणीचा हंगाम असतो. लोक या पिकांचा आनंद घेतात आणि हे सण साजरे करतात . त्याचबरोबर आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज देखील अधोरेखित करतात. हे केवळ भारतीय विविधतेचेच नव्हे तर आपल्या देशाच्या विविधतेतील एकतेचे देखील उदाहरण आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की या सणांमुळे लोकांमध्ये बंधुभावाची भावना निर्माण होवो आणि आपल्या देशात समृद्धी आणि आनंद नांदो . "