भारतीय क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतीय क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण झाली आहे. सुंदरचा दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिका संघात समावेश असून आता तो खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सुंदरला काही दिवस आधीच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलीगीकरणात होता. त्यामुळे तो आज (12 जानेवारी) संघासोबत आफ्रिके दौऱ्यावर जाणार नसल्याचे समोर येत आहे. 19 जानेवारी सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत सुंदरच्या जागी बीसीसीआय कोणाला संधी देते हे पाहावे लागेल.