बँक अाॅफ महाराष्ट्रच्या गृह, वाहन कर्जाच्या व्याजदरात घट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बँक अाॅफ महाराष्ट्रच्या गृह, वाहन कर्जाच्या व्याजदरात घट

सोलापूर , : बँक अाॅफ महाराष्ट्रच्या गृह अाणि वाहन कर्जाच्या व्याजदरात घट झाल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक सुनीता भाेसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. बँकेने सणासुदीच्या हंगामातीलरिटेल बाेनांझाम्हणून नवीन व्याजदर जाहीर केले. गृह कर्जावरील व्याजदर .८० वरून .४० टक्क्यावर तर वाहन कर्ज .०५ टक्क्यांवरून .८० टक्क्यांवर आणल्याचे त्या म्हणाल्या. हे दर कर्जदाराच्या पतमापनाशी (क्रेडिट स्कोअर) निगडित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने यापूर्वीच सर्वात स्वस्त गृहकर्जे देण्यास सुरुवात केली. नव्या दराने त्यात आणखी भर पडली. गृह, वाहन आणि सोने कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींनी बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क साधावा, असे भोसले म्हणाल्या. स्वत:चे घर अन् वाहन हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्याच्या पूर्ततेसाठी बँकेने व्याजदरात घट केली. सणांच्या निमित्ताने हा धमाका ऑफ अाहे. जास्तीत जास्त जणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे भोसले म्हणाल्या. या वेळी उपक्षेत्रीय व्यवस्थापक डी. एम. कावेरी, कर्ज विभाग प्रमुख प्रवीण तिवारी उपस्थित होते.