पुणे, नागपूर, अकोला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे भरणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुणे, नागपूर, अकोला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे भरणार

मुंबई : सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेंतर्गत नागपूर, पुणे तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्याच्या उपलब्ध मनुष्यबळात वाढ करून 9 अध्यापकीय पदांची निर्मिती करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
त्यानुसार वै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, अकोला या तीन संस्थांकरिता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक सहायक प्राध्यापक अशी एकूण पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांसाठी वार्षिक एक कोटी पंच्चाहत्तर लाख दहा हजार सहाशे बावन्न  खर्च होईल. तसेच सद्याच्या एकूण २७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त ५९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची वाढ होईल.