पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी आपली माहिती तात्काळ वॉर रूमला द्यावी; महापौरांचे आवाहन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी आपली माहिती तात्काळ वॉर रूमला द्यावी; महापौरांचे आवाहन

ठाणे : शहरातील मेडिकल्स शॉपमध्ये कोव्हिड-१९ च्या चाचणीसाठी उपलब्ध असणाऱ्या सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांनी आपली माहिती तात्काळ वॉर रूमच्या ९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
शहरात कोविड -१९ चाचणी करण्यासाठी मेडिकल्स शॉपमध्ये उपलब्ध असणाऱ्या सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून नागरिक परस्पर घरीच कोरोनाची चाचणी करत आहेत. परंतु चाचणी पॉझिटिव्ह आल्यास महापालिकेस न कळविता परस्पर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संपूर्ण माहिती वॉर रूमकडे असणे अत्यावश्यक आहे. तरी सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी आपली माहिती ९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर संपर्क देण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.