पाकिस्तानात बर्फवृष्टीत २१ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पाकिस्तानात बर्फवृष्टीत २१ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या उत्तरेला असलेल्या मरी भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली असल्यामुळे पाकिस्तान सरकारने आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
अनेक जण ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात अनेक पर्यटक आले असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे बचावकार्यातही अडथळे येत आहेत.बचाव कार्यामध्ये प्रशासनाची मदत करण्यासाठी सैन्य आणि अर्धसैनिक दलाची मदत घेतली जात आहे. मृतांचा आकडा वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत.