नायजेरियातील बाजारात बेछूट गोळीबार, 43 जणांचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नायजेरियातील बाजारात बेछूट गोळीबार, 43 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, :  नायजेरियातील बाजारात काही जणांनी बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोकोतो राज्यातील गोरोन्यो या गावामध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास काही बंदुकधा-यांनी अचानक हल्ला केला. बाजारात गर्दी असल्यामुळे लोकांची धावपळ झाली. बाजाराचा दिवस असल्यामुळे याठिकाणी अनेक व्यापारी आणि ग्राहक आले होते. हा हल्ला का करण्यात आला यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान अलिकडच्या भागात येथील भागात हिंसक घटनांचे प्रमाण वाढले आहे. हिंदुस्थान समाचार