टीव्हीएसतर्फे दोन नवीन ड्युअल टोन रंगांमध्ये टीव्हीएस रेडियन सादर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टीव्हीएसतर्फे दोन नवीन ड्युअल टोन रंगांमध्ये टीव्हीएस रेडियन सादर

होसूर : दुचाकी व तीनचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या टीव्हीएस मोटर कंपनी या जगातील नामांकित कंपनीने टीव्हीएस रेडियनहे मोटरसायकलचे मॉडेल दोन नवीन ड्युअल टोनरंगांमध्ये सादर केले आहे. रेड अँड ब्लॅक'' आणि ''ब्लू अँड ब्लॅक'' या रंगांची ही थीम क्लासिक मोटरसायकलींच्या जगतापासून प्रेरित आहे. ग्राहकांसाठी ड्युअल टोनपर्याय सादर करणारी ही या विभागातील पहिली मोटरसायकल आहे. २०१८मध्ये सादर झाल्यापासून टीव्हीएस रेडियनने ग्राहकांना उत्कृष्ट कामगिरी, सर्वोत्कृष्ट श्रेणीतील वैशिष्ट्ये आणि मजबूत ग्राहक-केंद्रित डिझाइन या आपल्या वैशिष्ट्यांतून नेहमीच आनंद दिला आहे. वाढीव टिकाऊपणाव्यतिरिक्त, या ब्रँडच्या मोटरसायकली आपल्या अद्वितीय उद्योग-प्रथम शैलीसाठी ओळखल्या जातात. त्यातून ग्राहकांसाठी मूल्य प्रस्ताव निर्माण होतो. नवीन ड्युअल टोनची ही आवृत्ती ग्राहकांच्या आनंदात आणखी भर घालणार आहे.
टीव्हीएस रेडियनमध्ये नेक्स्ट-जनरेशन इकोथ्रस्ट फ्युएल इंजेक्शन’ (इटी-एफआय) हे तंत्रज्ञान आहे. यामुळे या गाडीचे मायलेज १५ टक्क्यांनी जास्त येते, तसेच इंजिनचे कार्यप्रदर्शनही अधिक चांगले मिळते, इंजिनचा टिकाऊपणा वाढतो आणि चालकाला नितळ रायडिंगचा अनुभव येतो. मजबूत मेटल बिल्ड, दणकट शैली आणि आलिशान स्वरुपाचा आराम ही या मोटरसायकलीची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.
टीव्हीएस रेडियन ड्युअल टोनही मोटरसायकल प्रीमियम क्रोम हेडलॅम्प’, नवीन क्रोम रिअर व्ह्यू मिरर’, ‘प्रीमियम डॅशबोर्ड’, नवीन फ्रंट डिस्क ब्रेक्स’, नवीन मजबूत थाय पॅड डिझाइनआणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असे प्रीमियम कुशन सीटयांसारख्या रोमांचक नवीन वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. वर्धित स्थिरता आणि आराम यांसाठी क्रोम श्राऊडसह सॉलिड रीअर सस्पेंशनआणि ड्युराग्रिप टायर्ससह १८ इंची मोठी चाके यांसारखी सर्वोत्कृष्ट श्रेणीची वैशिष्ट्येही या गाडीमध्ये मिळतात. सीटची परिपूर्ण उंची, मोठा ग्राउंड क्लीयरन्स’, लांब व्हील-बेसयांमुळे या गाडीच्या चालकाला रायडिंगचा अनुभव अखंडपणे मिळतो. तसेच, ‘यूएसबी चार्जिंग स्पॉट’, सोयीस्कर पद्धतीचा ऑल-गियर सेल्फ-स्टार्ट’, बीपर असलेला साइड स्टँड इंडिकेटरआणि पिलियन ग्रॅब-रेलयांसारख्या अतिशय सुलभ अशा सुविधांमुळेही चालकाला गाडी हाताळण्याचा उत्तम अनुभव येतो. टीव्हीएस रेडियनच्या इलेक्ट्रिक स्टार्ट एमएजी ड्रम ब्रेक व्हेरियंटची प्रारंभिक किंमत 65,782 रु. (एक्स-शोरूम महाराष्ट्र) आहे, तर इलेक्ट्रिक स्टार्ट एमएजी डिस्क ब्रेक व्हेरियंटमधील ड्युएल टोन एडिशनची किंमत 72,732 रु. (एक्स-शोरूम महाराष्ट्र) आहे.