गोवा : काँग्रेस नेते रेजिनाल्ड यांचा टीएमसीत प्रवेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गोवा : काँग्रेस नेते रेजिनाल्ड यांचा टीएमसीत प्रवेश

पणजी,: गोवा काँग्रेसला आणखी एक धक्का बसलेला पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे आमदार एलेक्सो रेजिनाल्ड यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एलेक्सो रेजिनाल्ड कोलकाता येथे पोहोचले असून ते पक्षाचे जनरल सेक्रेटरी अभिषेक बॅनर्जी यांची उद्या भेट घेणार आहेत. त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला असून त्यांच्या या राजीनाम्यामुळे गोवा विधानसभेमध्ये आता काँग्रेसचे दोनच आमदार उरले आहेत. तसेच आमदार प्रतापसिंह राणे हे देखील काँग्रेसच्या तिकिटावर आगामी निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जातेय. गोव्यासारख्या छोट्या राज्यावर तृणमूल काँग्रेस, सत्ताधारी भाजप आणि आम आदमी पार्टीची नजर असून तेथील राजकारणाला आता रंग चढला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसने आपल्या 8 उमेदवारांची यादी गेल्या आठवड्यात जाहीर केली होती. परंतु, त्यानंतरही काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह आणि धुसफुस कायम असल्याचे चित्र आहे.