गोदरेज अॅप्लायन्सेसला वॉशिंग मशीनसाठी मिळाला सीआयआय डिझाईन एक्सलन्स पुरस्कार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गोदरेज अॅप्लायन्सेसला वॉशिंग मशीनसाठी मिळाला सीआयआय डिझाईन एक्सलन्स पुरस्कार

 मुंबई, : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसने आपली व्यवसायशाखा असलेल्या गोदरेज अॅप्लायन्सेसला ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी उत्पादन रचना विभागात अलिकडेच सादर करण्यात आलेल्याएज अल्टीमा - स्टीलनॉक्सवॉशिंग मशीनसाठी सीआयआय डिझाईन एक्सलन्स पुरस्कार २०२१ मिळाल्याचे जाहीर केले.
पुरस्कारासाठी असलेल्या प्राथमिक मुल्यांकन निकषांमध्ये सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता, मानवी दृष्टीकोन, शाश्वतता यांचा समावेश होता. मूल्यांकनाचे हे सर्व निकष पार पाडताना ग्राहकोपयोगी वस्तू विभागात सर्वंकष विजेता म्हणून गोदरेज अॅप्लायन्सेसला मान्यता मिळाली. भारतात नवीन डिझाईन्सची कवाडे निर्माण करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या संस्थांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
गोदरेज एज अल्टीमास्टीलनॉक्स मध्ये सौंदर्यशास्त्र, टिकावूपणा आणि शाश्वतता या गोष्टींचे परिपूर्ण मिश्रण आहे. याचे हळूवार उघडबंद होणारे, रंगछटा असलेले जाड काचेचे झाकण यासह आगळेवेगळे कडाविरहीत डिझाईन आहे. जोडीला, कंट्रोल पॅनेल मजबूत काचेने सुरक्षीत असल्यामुळे पाणी आत जाणार नाही याची खात्री आहे. वॉश आणि स्पिन साठीचे दोन्ही ड्रम गंजविरहीत स्टेनलेस स्टीलने बनवलेले आहेत. बेझेल डिझाईनने ग्राहकांसाठी झाकणांचा वापर सोयीचा केला आहे. पर्यावरणाशी ब्रँडची बांधिलकी जपताना या मशीनमध्ये पंचतारांकित बीईई मानांकन आहे. त्यामुळे ऊर्जा आणि पाणी यांचे जतन व्हायला मदत होते. स्पर्धात्मक युगात ही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यं आणि रचना या मशीनला उच्च कामगिरी उत्पादन बनवितात. हे मशीन क्रिस्टल ब्ल्यू आणि क्रिस्टल ग्रे अशा दोन आकर्षक रंगांमध्ये येते.
पुरस्कार स्वीकारताना गोदरेज अॅप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष श्री. कमल नंदी म्हणाले, “नाविन्यपूर्णता, ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि पर्यावरण यांवर आमचा असलेला अथक भर याने आम्हांला एज अल्टीमास्टीलनॉक्स सारखे पुरस्कार विजेते उत्पादन बनवायला सक्षम केले आहे. या मान्यतेमुळे आमच्या टीमला ग्राहकांसाठी अधिकाधिक नाविन्यपूर्ण उत्पादने बनवायला प्रेरणा मिळेल. ‘सोच के बनाया हैया आमच्या ब्रँड तत्वज्ञानाशी हे सुसंगतच आहे. आम्ही लोक आणि पायाभूत सुविधा अशा दोन्ही गोष्टींसंदर्भात उत्पादन डिझाईनमध्ये गुंतवणूक करत आहोत आणि ब्रँडसाठी त्याची चांगली फळं मिळत आहेत.”