कार्तिक आर्यनने घेतली करोनाची पहिली लस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कार्तिक आर्यनने घेतली करोनाची पहिली लस

करोनाची पहिली लस घेतल्यानंतर कार्तिक आर्यनने एक फोटो शेअर केलाय. मुंबईतल्या खार स्थित पीडी हिंदुजा हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये त्याने करोनाची पहिली लस घेतली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आता दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. अशातच करोना लस घेणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. यात बॉलिवूडमधील कलाकार सुद्धा मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी करोनाची पहिली लस घेतलीय. नुकतंच बॉलिवूड अभिनेत कार्तिक आर्यनने सुद्धा करोनाची पहिली लस घेतली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बराच सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. आता नुकतंच त्याने करोनाची पहिली लस घेतल्यानंतर एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. मुंबईतल्या खार स्थित पीडी हिंदुजा हॉस्पिटल ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये त्याने करोनाची पहिली लस घेतली. याचा फोटो शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “आता अँटीबॉडीज लोड होत आहेत..”, असं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलंय. पण, लस जरी घेतली असली तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्यांना केलंय कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या या फोटोवर फॅन्सनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. काही फॅन्सनी तर त्याला काळजी घेण्यासाठी सांगत कमेंट्स केल्या आहेत. तर काही फॅन्सनी त्यालानॅशनल क्रशम्हटलं आहे.