कार्तिकला मिळाला नवा प्रोजेक्ट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कार्तिकला मिळाला नवा प्रोजेक्ट

कार्तिक आर्यन काही काळापासून दोस्ताना 2’ मधून बाहेर झाल्यापासून सतत चर्चेत आहे. करण जोहरच्या होम प्रॉडक्शनच्या दोस्ताना 2 मध्ये कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर ही जोडी होती. मात्र चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग झाल्यानंतर कार्तिकला करण जोहरने बाहेरचा रस्ता दाखवला. आता कार्तिकला साजिद नाडियादवालाच्या बॅनर खाली बनत असलेल्या लव्ह स्टोरीसाठी घेण्यात आल्याची बातमी आहे.
प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्वीटी आणि लव्ह आज कल 2 या चित्रपटांमध्ये चॉकलेट बॉयच्या रुपात दिसलेला कार्तिक पुन्हा एकदा पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार, या ऐतिहासिक प्रेमकथेची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि नम: फिल्म्स मिळून करणार आहे. तर समीर विध्वंस याचे दिग्दर्शक असतील.

साजिद गेल्याकाही दिवसांपासून कार्तिकसोबत चित्रपटाची योजना आखत होते. ते एका कथेच्या शोधात होते. त्यात कार्तिक आर्यन फिट बसतो. त्याची चाॅकलेटी इमेज ध्यानात ठेवून त्याला ही रोमँटिक लव्ह स्टोरी मिळाली आहे. आतापर्यंत कार्तिकने अशी भूमिका साकारली नसल्याचे बोलले जात आहे. साजिदचा हा चित्रपट अजून प्री-प्रॉडक्शन स्टेजवर आहे. चित्रपटाचे नाव अजून ठरले नाही.