ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेक उड्डाणे रद्द

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेक उड्डाणे रद्द

वॉशिंग्टन : ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रमाणामुळे जगभरातील ४५०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर १० हजारांपेक्षा अधिक विमान विलंबाने धावत आहेत. नाताळच्या सुट्टीत अनेक परदेशी नागरिक प्रवासाला निघाले आहेत. मात्र ओमायक्रॉनमुळे प्रवाशांना अनेक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. उड्डाणे रद्द करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये लुफ्तान्सा, डेल्टा आणि युनायटेड यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळेही उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.