'एल अँड टी'ने पटकावले प्रतिष्ठेचे कंत्राट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'एल अँड टी'ने पटकावले प्रतिष्ठेचे कंत्राट

मुंबई : लासर्न अँड टुब्रोच्या मालकीची उपकंपनी असलेल्या एल अँड टी हायड्रोकार्बन इंजिनिअरींग (एलटीएचई)च्या अधिपत्याखालील एका परीसंघाने परदेशातील एका प्रतिष्ठित ग्राहकाकडून दोन परकीय कंत्राटे पटकावली आहेत.
नवीन प्रकल्पांसाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) करणे तसेच सध्याच्या स्थापित प्रकल्पांसोबत समन्वयन करणे यांचा या कंत्राटांच्या कामाच्या व्याप्तीमध्ये समावेश आहे.
एलटीएचई ही सध्या काही आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय परकीय प्रकल्पांवर काम करत आहे. एलटीएचई ही विविध भौगोलिक स्थानांत आपल्या स्थानिक विभागीय कामकाजाची उभारणी करण्यासाठी कटीबद्ध आहे. स्थानिक वाढत्या कौशल्ये आणि बुद्धिमान मनुष्यबळाच्या सहाय्याने कार्यरत असून कामकाजाच्या शाश्वत ओघाच्या पायावर केली जाणारी स्थानिक पुरवठादारांकडची सुधारित खरेदी, स्थानिक कंत्राटदारांसोबत व्यापारी तत्त्वावर केली जाणारी जोडणी याच्याशी देखील एलटीएचई बांधील आहे.
परकीय, देशीय कंत्राटे, बांधकाम सेवा, मॉड्युलर फॅब्रीकेशन आणि आधुनिक मूल्य अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (AdVENT) शाखांमध्ये संघटीत असलेली एलटीएचई हायड्रोकार्बन क्षेत्रापासून ते अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्राहकांना समन्वित डिझाईन टू बिल्ड उपयोजना पुरविण्याचे काम करते. तीन दशकांचा समृद्ध अनुभव असलेली कंपनी प्रकल्प व्यवस्थापन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, गुणवत्ता, एचएसई आणि कामकाजातील अव्वलता यांच्या सर्व बाबींमध्ये जागतिक मापदंड प्रस्थापित करत आलेली आहे.

पार्श्वभूमी:
लासर्न अँड टुब्रो ही ईपीसी प्रकल्प, हाय टेक उत्पादन आणि सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरातील ५० देशांत तिचा कार्यविस्तार आहे. एक सक्षम आणि ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण उच्च गुणवत्ता राखण्याच्या आपल्या ध्यासामुळे एल अँड टीने गेली आठ दशके आपल्या प्रमुख व्यवसाय क्षेत्रात आघाडीचे स्थान कायम राखून ठेवलेले आहे.