आयकर रिटर्न भरण्याची तारीख 15 मार्चपर्यंत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आयकर रिटर्न भरण्याची तारीख 15 मार्चपर्यंत

केंद्राने 2020-2021 साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली आहे. मात्र, ही मुदत केवळ कॉर्पोरेटसाठी वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ कॉर्पोरेट्स मार्चच्या मध्यापर्यंत FY21 साठी आयकर रिटर्न भरू शकतात. टॅक्स ऑडिट रिपोर्ट्स आणि ट्रान्सफर प्राइसिंग ऑडिट रिपोर्ट्स दाखल करण्याची अंतिम मुदतही 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सध्याच्या कोविड-19 परिस्थितीमुळे करदात्यांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आली आहे. अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, प्राप्तिकर कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार विविध ऑडिट रिपोर्ट्सच्या -फायलिंगमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सामान्य नागरिकांसाठी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. ती वाढविण्यात आलेली नाही. तथापि, ज्यांनी अद्याप ITR दाखल केलेला नाही ते 31 मार्च 2022 पर्यंत विलंब शुल्कासह ITR दाखल करू शकतात.