आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य संघटनेला निरीक्षक दर्जा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य संघटनेला निरीक्षक दर्जा

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य आघाडीला निरीक्षक दर्जा दिला आहे. यामुळे एक सूर्य, एक जग, एक ग्रीडया संकल्पनेला चालना मिळणार आहे. समन्यायी ऊर्जा उपायांसाठी यामुळे साहाय्य मिळणार आहे.
या संदर्भात ट्वीटरद्वारे केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य आघाडीला निरीक्षक दर्जा देण्याविषयी घेतलेला ऐतिहासिक निर्णय पंतप्रधानांच्या 'एक सूर्य, एक जग एक ग्रीड' या संकल्पनेला पुढे नेणारा ठरणार आहे.
सौर उर्जेच्या उपयोजनाद्वारे न्याय्य आणि समान ऊर्जा उपाय अमलात आणण्याच्या प्रयत्नांना यामुळे मोठी चालना मिळेल. जागतिक सहकार्याद्वारे शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात यामुळे मोठे साहाय्य मिळणार असल्याचेही सिंह यांनी नमूद केले. ऊर्जा संयोगात अक्षय ऊर्जेचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढवत, भारत या अभियानात अधिकाधिक वाटा देत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.