आतापर्यंत 14 आमदारांचे राजीनामे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आतापर्यंत 14 आमदारांचे राजीनामे


पणजी : गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर ही राजकीय पक्षांसाठी मोठी समस्या बनली आहे. एकूण 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत आतापर्यंत 14 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर 3 राष्ट्रीय व प्रादेशीक पक्षांचे विलिनीकरण देखील झालेय. उपरोक्त 14 राजीनाम्यांपैकी सर्वाधिक राजीनामे पक्षांतरामुळे झाल्याची माहिती गोवा विधानसभेच्या सचिव नम्रता उलमन यांनी दिली.
यासंदर्भात उलमन म्हणाल्या की, गोवा विधानसभेत पक्षांतराच्या कारणास्तव सर्वाधिक आमदारांनी राजीनामे दिले आहेत. याशिवाय 3 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाची विलीनीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नम्रता या विधानसभेच्या पहिल्या महिला सचिव आहेत. त्यांच्याच कार्यकाळात सर्वाधिक आमदारांनी राजीनामे दिले. निवडणूक आयोगाने राज्यात निवडणुका जाहीर करत आचारसंहिता लागू केली आहे. आता पक्षांतरबंदी कायदा अधिक कडक झाल्याने एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करण्यासाठी आमदारांना राजीनामा देणे गरजेचे आहे. त्यानुसारच आतापर्यंत 14 आमदारांनी राजीनामे दिले. हे राजीनामे स्वीकारण्याचे काम सभापतींना करावे लागते. मात्र, त्यांच्या गैरहजेरीत हे काम सचिव करतात. सध्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे काम नम्रता उलमन यांना करावे लागत आहे.

राजीनामा देणाऱ्यांची यादी
विश्वजीत राणे : 16 मार्च 2017
सुभाष शिरोडकर : 16 ऑक्टोबर 2018
दयानंद सोपटे : 16 ऑक्टोबर 2018
लुईझींन फालेरो : 27 सप्टेंबर 2021
जयेश साळगावकर : 2 डिसेंबर 2021
रवी नाईक : 17 डिसेंबर 2021
रोहन खंवटे : 15 डिसेंबर 2021
एलिना साल्ढाणा : 16 डिसेंबर 2021
आलेक्स रेजिनाल्ड : 20 डिसेंबर 2021
कार्लुस आल्मेदा : 21 डिसेंबर 2021
प्रसाद गावकर : 9 जानेवारी 2022
मायकल लोबो : 10 जानेवारी 2022
प्रवीण झांट्ये : 10 जानेवारी 2022
गोविंद गावडे : 10 जानेवारी 2022