'अला वैकुंठ पुरम् लो' एक अद्भुत प्रवास होता : अल्लू अर्जुन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'अला वैकुंठ पुरम् लो' एक अद्भुत प्रवास होता : अल्लू अर्जुन

'पुष्पा ' द्वारे अखिल भारतीय स्तरावर ख्याती आणि प्रसिद्धीचा आनंद अनुभवत असलेला अभिनेता अल्लू अर्जुनने ' अला वैकुंठ पुरम लो ' या विशेष आणि विक्रमी चित्रपटाच्या आठवणी जागविल्या.
चित्रपटाच्या द्वी-वर्षपूर्ती निमित्त ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना ??? अल्लू अर्जुन म्हणाला, 'अला वैकुंठ पुरम् लो'ची दोन वर्ष पूर्ण... मधुर आठवणी... काय अद्भुत प्रवास होता. याचा गोडवा आजही जाणवतो. या कार्यमस्वरूपी ??? विशेष अनुभवासाठी धन्यवाद त्रिविक्रम गारु... आणि माझा थमन... दशकातील संगीत दिलेस... सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि संपूर्ण वृंदास धन्यवाद. सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन. ??? आगामी काळातही आपण आनंद साजरा करू ही आशा... गोड आहे ना ??? मलादेखील आवडलं... ??? " ???

अभिनेते अल्लू अर्जुन यांचा 'अला वैकुंठ पुरम् लो ' चित्रपट 12 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित झाला. प्रदीर्घ अवकाशानंतर, जवळपास 647 दिवसानंतर 2020 वर्षी स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन यांनी पुन्हा एकदा सुपेरी पडद्यावर धमाकेदार पुनरागमन केले होते. चित्रपटातील सर्व गाण्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले तसेच सामाजिक माध्यमांवर सर्व विक्रम तोडीत नवीन विक्रम प्रस्तापित केला.
अल्लू अर्जुन यांच्या केरळमधील चाहत्यांची संख्या लक्षात घेत अला वैकुंठ पुरम् लो मल्याळम भाषेतही प्रदर्शित करण्यात आला. अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांची जोडीने तिसऱ्यांदा प्रेक्षकांना घायाळ केले. साहित्य आणि लेखनासाठी प्रसिद्ध असलेले त्रीविक्रम यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच संगीत दिगदर्शक एस. एस थमन यांच्या गाण्यांमुळे चित्रपट मोठ्या प्रमाणावर गाजला. संगीताबरोबर अल्लू अर्जुन यांचे नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. चित्रपटाचे स्वागत करण्यासाठी जागोजागी अल्लू अर्जुन यांचे मोठं मोठाले फलक , चित्र लावण्यात आले होते.
'अला वैकुंठ पुरम् लो ' या चित्रपटातील 'सामाजवर गमना ' या गाण्याने सामाजिक माध्यमांवर धूम ठोकली. युवा गायक सिड श्रीराम यांनी हे गाणे म्हटले आहे तर जेष्ठ साहित्यिक सीताराम शास्त्री यांनी शब्दबद्ध केले आहे. 'बुट्ट्ट बोम्मा ' या अरमान मलिक यांच्या गाण्याने 'रील ' द्वारे भरून गेले, अन्य गाण्यांनीही भाषचे बंधन तोडीत चाहत्यांना मोहून टाकले.
90 च्या काळात अनेक आघाडीच्या तेलुगू अभिनेत्यांसोबत काम केल्या नंतर तब्बल दहा वर्षांनी अभिनेत्री तब्बू यांनी 'अला वैकुंठ पुरम् लोया चित्रपटातून पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटांकडे पुनरागमन केले. तब्बू या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसल्या . अभिनेत्री पूजा हेगडे आणि अल्लू अर्जुन दुसऱ्यांदा एकत्र आले . यापूर्वी त्यांनी " डीजे " चित्रपटात काम केले होते. 'अला वैकुंठ पुरमलो ' चित्रपटात अल्लू अर्जुन, अभिनेत्री तब्बू, पूजा हेगडे यांच्या शिवाय निवेथा पेथुराज, सुमंथ, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, जयराज प्रमुख भूमिकेत होते. 'अला वैकुंठ पुरम् लो ' हा चित्रपट सन नेक्स्ट आणि नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
पुष्पा : दि राईज चित्रपद्वारे अल्लू अर्जुन यांनी प्रस्थापित चित्रपटांना मागे टाकत धमाकेदार अखिल भारतीय आगमन केले आहे. विविध भाषांमधील आघाडीच्या अभिनेत्यांनी, मान्यवरांनी पुष्पा आणि अल्लू अर्जुन चे जाहीर कौतुक केले आहे. 7 जानेवारी रोजी पुष्पा : दि राईज तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत इंग्रजी सह-शीर्षकांसह प्रदर्शित करण्यात आला.