अमेरिकेत अज्ञाताने केलेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अमेरिकेत अज्ञाताने केलेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : अमेरिकेतील डेन्वर शहरात एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युतरात हल्लेखोराचाही मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेन्वर शहराच्या मध्यभागी अचानक एका बंदुकधा-या व्यक्तीने गोळीबार केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस आणि अज्ञातामध्ये चकमक सुरू झाली. त्या हल्लेखोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्लेखोराने पुन्हा गोळीबार केला. यावेळी चकमकीदरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. हल्ला करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच हल्लेखोराची ओळखही अद्याप पटलेली नाही.